सुरक्षेच्या कारणास्तव विधीमंडळाचे अधिवेशन गुंडाळले

0
633

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – भारत पाकिस्तान यांच्यात  तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  गुंडाळण्यात  आले आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय  घेण्यात आला.   

अधिवेशन गुंडाळणे म्हणजे पळपुटेपणा आहे, अशी टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली आहे. अधिवेशन स्थगित करण्यास आमचा विरोध आहे.  एकीकडे मोदी देशभरात फिरतात, सभा घेतात. त्यांना संरक्षण लागत नाही का, असा सवाल करत हे नाटक बंद करा.  आपला विंग कमांडर पाकिस्तानात आहे, आपण पळपुटेपणा करत आहोत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

गुरूवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सुरक्षा आढावा बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा झाली होती. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार विधानभवन परिसरात असतात.  महत्वाचे व्यक्ती येथे असल्याने हा परिसर जास्त संवेदशनशील असतो. या पार्श्वभूमीवर  अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला.