सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल; तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत

0
405

मुंबई, दि, २८ (पीसीबी) – मुंबई उच्च न्यायालयाने काल मराठा आरक्षणाबाबत महत्वपुर्ण निकाल दिला आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण हे घटनेच्या बाहेर नसून ते वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे अस अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला. यात मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता मिळाली आहे. परंतु अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ‘मराठा आरक्षणाबाबतचा निकाल घटनाबाह्य असून तो दबावाखाली दिला गेला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. असंं विधान केले आहे. त्याला नितेश राणे यांनी कालच्या निकालाच्या विरुद्ध कोण सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल..तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत. हर हर महादेव असंं म्हणत उत्तर दिले आहे.