सीबीआय चौकशी दरम्यान रियाचे धक्कादायक खुलासे; म्हणाली, ‘सुशांतला दिसलं होत भूत’; सांगितला पूर्ण घटनाक्रम

0
436

मुंबई,दि.१२(पीसीबी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात तपास दरम्यान नवनवीन माहिती समोर येतीये. जी तपासाला वेगळं वळण देतीये. सीबीआयकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरूच आहे. मात्र याआधी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये रियानं सुशांतच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल धक्कादायक असे खुलासे केलेत

रियाने सांगितलेला घटनाक्रम असा कि, ‘मी माझा भाऊ शोविक अन सुशांत, आम्ही तिघे मिळून 2019 मध्ये युरोपला गेलो होतो. तेव्हा इटलीमधल्या फ्लाॅरेन्स शहरातील 600 वर्ष जुन्या हाॅटेल आम्ही थांबलो होतो. मी अन् शोविक एका रूममध्ये तर सुशांत एका दुसऱ्या रुममध्ये होता. तेव्हा काही कामानिमित्त मी आणि शोविक हाॅटेलमधून काही वेळ बाहेर गेलो होतो.’

‘काही तासात आम्ही हाॅटेलवरती परत आलो. तेव्हा सुशांत रूमच्या एका कोपऱ्यात बसून रूद्राक्ष माळेचा जप करत होता.तो खुप घाबरला होता. सुशांतच पूर्ण शरीर थरथर कापत होतं. मी आणि शौविक ने सुशांतला हाॅटेलमधल्या दुसऱ्या रुममध्ये नेले आणि त्याला काय झालं? इतका का घाबरलायस? याच कारण विचारलं. तेव्हा त्याने रूममध्ये घडलेला प्रकार सांगितला.
गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराची पेंटींग सुशांतने हाॅटेलमध्ये पाहिली होती. त्या पेंटींगमध्ये एक राक्षस एका मुलाला खात असल्याचे चित्र काढलं होत. सुशांत या पेंटींगला पाहून प्रचंड घाबरला होता. तो राक्षस त्याला बोलावत असल्याचं सुशांतनं आम्हाला सांगितलं. मात्र सुशांतची तब्येत अचानकच बिघडू लागली आणि म्हणून आम्ही त्याला पुन्हा मुंबईला घेऊन आलो.’ असे खुलासे रियाने चौकशी वेळी केले आहेत.