सिमेंट ब्लॉक फॅक्टरीमधून हॅलोजन बल्ब, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरी

0
254

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – चोरट्यांनी सिमेंट ब्लॉक फॅक्टरीमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तीन हॅलोजन बल्ब चोरून नेले. ही घटना ताजणेमळा चऱ्होली येथे गुरुवारी (दि. 30) रात्री घडली.

पुष्कराज मनसुखलाल अग्रवाल (वय 42, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश गुंड (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व एक अनोळखी आरोपी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ताजणेमळा येथे सिमेंट ब्लॉक तयार करण्याची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील सहा हजार रुपये किंमतीचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे व पाच हजार रुपये किमतीचे तीन हॅलोजन बल्ब असा एकूण अकरा हजार रुपयांचा माल आरोपी यांनी चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.