साहेब माफ करा…यावेळी भाजपला मतदान नाही, आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला’

0
573

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  माननीय उद्धवसाहेब…जय महाराष्ट्र !! किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला सेना भाजपाची युतीची उमेदवारी मिळू दिली नाही. तेव्हा आम्हाला खुप अभिमान वाटला !!! आण महिलांना अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी आपली ठाम भूमिका होती. पण आज भाजपने युतीची घाटकोपरची उमेदवारी त्याला दिली. साहेब माफ करा…यावेळी भाजपाला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला’

अशा आशयाचे घाटकोपरमधील एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. यात  भाजपला मतदान करणार नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरच्या शेवटी घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक असा उल्लेख करण्यात आला आहे.

महायुतीत  घाटकोपरची जागा भाजपकडे देण्यात आली आहे. भाजपने घाटकोपर पश्चिमेतून राम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी पोस्टर लावून आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.