सावरकरांची प्रशंसा केल्याने सोनिया गांधी संतप्त; अभिषेक सिंघवींना माफी मागावी लागली

0
448

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणारे ट्विट केल्या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना स्पष्टीकरण  देण्यास सांगून दिलगिरी व्यक्त करण्याच्या सुचना  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत.

मी वैयक्तिकरीत्या सावरकरांच्या विचारसणीचे समर्थन करत नाही. मात्र,  सावरकर हे एक परिपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढाई लढली आणि देशासाठी तुरुंगवासही भोगला. हेही नाकारत नाही,  अशा आशयाचे ट्विट सिंघवी यांनी  केले होते.

या ट्विटमधील आशयामुळे  सोनिया गांधी कमालीच्या संतप्त झाल्या होत्या.  त्यानंतर त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकरवी सिंघवी यांना संदेश पाठवून फोन करण्यास सांगितले.  तसेच या प्रकरणी सिंघवी यांना प्रसारमाध्यमांवर येऊन माफी मागावी, अशा सुचना दिल्या. दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांच्या ट्विटमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती.