सावध असा, पावसाळ्यात कोरोनाचा हाहाकार

0
327

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. मुंबईसाठी कोरोना सर्वाधिक धोकादायक आहे. मायानगर मुंबईत यापूर्वीच सर्वाधिक कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल.

आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. अभ्यासाचा असा दावा आहे की आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईच्या दोन प्राध्यापकांनी केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, खोकला किंवा शिंकलेल्या थेंबाला जास्त तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे कोरडे पडण्यास कमी वेळ लागतो. परंतु पावसाळ्यात ओलावा राहील आणि लोकांचा खोकला कोरडा होण्यास जास्त वेळ लागेल. यामुळे, संसर्ग होण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे. हे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

इतर देशांतील प्रकरणांचा देखील संशोधनासाठी समावेश आहे. या ताज्या संशोधनानुसार, थेंब कोरडे (ड्रॉपलेट) होण्यासाठी सिंगापूरने कमी लागला आणि जास्त वेळ न्यूयॉर्कमध्ये लागला. म्हणूनच न्यूयॉर्क हे जगातील कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

मुंबईने वुहानला टाकले मागे
चीनमधील वुहानमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. कोरोना इन्फेक्शनच्या बाबतीत मुंबईने वुहानला मागे टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार कोरोना इन्फेक्शनच्याबाबतीत मुंबईने वुहानला मागे टाकले आहे. आतापर्यंत वुहानमध्ये कोरोना संसर्गाची ५०,३४० आकडा नोंदवला गेला आहे. मुंबईत ५२,१०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाची अशी परिस्थिती केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातही कोरोना संसर्ग (९४,०००) अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.