सावधान !!! देशातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ

0
345

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : देशातील कोरोना संसर्गात चढ-उतार पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा किंचित वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची देशातील नवी आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 710 नवे रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोनारुग्ण विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 7 हजार 177 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशात 15 हजार 814 सक्रिय रुग्ण
भारतात 15 हजार 814 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोना रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात पाच लाखहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना संसर्गाचा दर 98.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा दर 0.04 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.58 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात 2361 सक्रिय रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात सध्या एकुण 2 हजार 361 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये एक हजार 658 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्याच्या मागोमाग पुण्यामध्ये 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे