” सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे” यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी..

0
170

मुंबई | गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं असून अधिका-यांच्या जीवालाही धोका आहे. यासंबधीची तक्रार ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आल्याची माहिती गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांना 7 दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले. त्यासंबधीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. नक्षलवाद्यांकडून शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात त्यांच्यासह कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी किंवा जिवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली आहे.