सामाजिक कार्यकर्ते तनपुरे आप मध्ये दाखल

0
205

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते, कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन चे अध्यक्ष अशोक तनपुरे आणि त्यांचे सहकारी श्री. लक्ष्मण शिंदे यांनी आप महाराष्ट्राचे राज्य संघटक श्री. विजय कुंभार यांच्या उपस्थिती मध्ये आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. आपने महापालिका निवडणुकीत उतरल्याचे आधीच जाहीर केले आहे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आप कडे एक चांगला राजकीय पर्याय म्हणून पाहत आहेत, आगामी काळात वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आम आदमी पार्टीशी जोडले जाणार आहेत अशी माहिती आपचे राज्य संघटनमंत्री विजय कुंभार यांनी दिली.

यावेळी आपचे सामाजिक न्याय विंग चे जिल्हाध्यक्ष वहाब शेख व शहरप्रमुख यशवंत कांबळे, शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, सचिव किशोर कदम, महिलाध्यक्ष स्मिता पवार, प्रवक्ते कपिल मोरे आणि शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते