सहाचे 27 लाख वसूलणाऱ्या खाजगी सावकारास अटक

0
552

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – सहा लाख रुपये घेतलेल्या कर्जाचे खाजगी सावकाराने तब्बल 27 लाख 60 हजार रुपये वसूल केले. तरीही पैशांसाठी त्याने तगादा लावला. कर्जदाराने कंटाळून पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी खाजगी सावकाराला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सन 2015 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत बिजलीनगर, चिंचवड येथे घडला.

सचिन प्रकाश ढवळे (वय 40, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक वाल्मीक सुर्यवंशी (वय 35 रा.चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सन 2015 मध्ये आरोपीकडून 10 टक्के व्याजदराने 6 लाख रुपये घेतले होते. ते कर्ज फिर्यादींनी फेडले. तरीही आरोपीने बळजबरीने चेक घेऊन चेकद्वारे, आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे फिर्यादीकडून तब्बल 27 लाख 60 हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या नावे असणारे देहुगाव येथील तीन फ्लॅट नोटरी करून स्वतःच्या नावावर करून घेतले. तसेच व्याजाचे पैशांची मागणी करत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी आरोपी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.