सर्वात मोठा पक्ष राजद, पण पुन्हा सत्ता एनडीएची

0
231

पाटणा, दि. ११ (पीसीबी) : तब्बल 18 तासांनी बिहार विधानसभा नवडणूक निकाल जाहीर झालाय. अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र, अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने विधानसभेच्या  एकूण 243 जागांपैकी बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे पाच जागा मिळालेला एमआयएम आता किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महागठबंधन सर्वाधिक जागांवर यशस्वी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये कोण बाजी मारेल? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं.

तब्बल 18 तासांच्या चढउतारानंतर निकाल स्पष्ट

मंगळवारी (10 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर होता. बिहार निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या प्रचारसभांमुळे यावेळी भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मंगळवारी सकाळी मतमोजनी सुरु झाली तेव्हादेखील तेच चित्र होतं.

मतमोजणी सुरु होऊन जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तसतसं भाजपचीदेखील आकडेवारी पुढे सरकू लागली. एनडीए सुरुवातील 60 ते 65 जागांवर आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर एनडीएने मोठी मुसंडी मारली आणि थेट 100 चा आकडा गाठत आघाडी घेतली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास महागठबंधन आणि एनडीए दोन्ही आघाड्या जवळपास 100 जागांवर आघाडीवर होत्या.

दुपारनंतर एनडीए 122 पेक्षाही जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र होतं. मात्र, महागठबंधन 100 ते 110 जागांवर अडकून पडलं होतं. दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशिब आजमावणारा एमआयएम पक्ष यावेळी दोन जागांवर आघाडीवर दिसत होता. दुपारी 3 नंतर एमआयएमने दोन जागांवर विजयी झाल्याचं स्पष्टही झालं.

या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) पदरात हवा तसा विजय मिळाला नाही. जेडीयू पक्ष सुरुवातीपासून 40 ते 50 जागांवर आघाडीवर दिसत होता. पण 50 च्या पुढे जाऊ शकला नाही. विशेष म्हणजे दुपारी जेडीयूच्या एका नेत्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं अपयश स्वीकारही केलं.

एमआयएमचा पाच जागांवर विजय

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे 2015 च्या निवडणुकीत एमआयएमला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दरम्यान, 2019 साली बिहारमध्ये एका पोटनिवडणुकीत एमआयएमने खातं खोललं होतं. त्यानंतर या निवडणुकीत एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे.

मतदानाची टक्केवारी 

  • पहिला टप्पा – 54 टक्के
  • दुसरा टप्पा – 53 टक्के
  • तिसरा टप्पा – 22 टक्के

कोणाच्या किती रॅली?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12
  • मुख्यमंत्री नितीश कुमार- 100
  • तेजस्वी यादव- 251
  • चिराग पासवान- 103
  • राहुल गांधी- 8
  • असदुद्दीन ओवैसी- 100

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

  • राजद – 80
  • काँग्रेस – 27
  • जदयू – 71
  • भाजप – 53
  • लोजप – 2
  • रालोसप – 2
  • हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
  • एकूण जागा – 243
  • ————————