सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडू – रूपाली चाकणकर

0
469

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  कुणी पक्ष सोडून गेले म्हणून पक्षाचे काम थांबत नाही. येत्या २ दिवसांनंतर महाराष्ट्र दौरा करून लोकांचे प्रश्न विचारात घेऊन सरकारला जाब विचारू आणि सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडू, असा आक्रमक पवित्रा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतला आहे.

प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला. त्यानंतर आगामी काळातील आपल्या कामाची दिशा त्यांनी स्पष्ट केली.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिला राष्ट्रवादीच्या  नव्या प्रदेशाध्यक्षा म्हणून चाकणकर यांची नियुक्ती केली  आहे

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांची या पदावर  निवड करण्यात आली आहे. दरम्यान,  रूपाली चाकणकर यांनी पुणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा पदाची जबाबदारी सांभाळली आहे.