समाजाच्या विनंतीला मान देत मनोज जरांगे हे पाच घोट पाणी घेण्यास राजी

0
203

जालना, दि. ३० (पीसीबी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे अन्नपाण्याशिवाय उपोषणावर ठाम आहेत. पण त्यांची प्रकृती खालावत चालल्यानं आता समाजानं त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करत आहे. आम्हाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी भूमिका घेतली. समाजाच्या या विनंतीनं भावूक होत अखेर जरांगेंनी चार घोट पाणी पिण्याचं मान्य केलं आहे. दरम्यान, समाजबांधव, माता भगिनी आणि पत्रकारांच्या विनंतीला मान देत पाच घोट पाणी पिण्याचे त्यांनी मान्य केले. पाणी पिताना त्यांना वेदना होत होत्या, असे त्यांनीच सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरच आंदोलन मागे घेणार अन्यथा ते अधिक तीव्र कऱणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

‘पाणी प्या, पाणी प्या’
मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्यानं मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. यावेळी मोठ्या जनसमुदायानं जरांगे यांच्यासमोर हात जोडून सामुहिकरित्या त्यांना ‘पाणी प्या, पाणी प्या’ अशा शब्दांत आर्त विनंती केली. आम्हाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी भूमिका यावेळी त्यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांची माहिती

चार-पाच घोट पाणी घेणार –
सामाजाचं हे प्रेम पाहून यावेळी मनोज जरांगे काही क्षण भावूक झाले तसेच त्यांनी पाणी पिण्याचं मान्य केलं. तुमच्यासाठी चार-पाच घोट पाणी घेतो, असं त्यांनी मान्य केलं. त्यानंतर उपस्थितांनी जोरात जल्लोष केला. यावेळी जरांगे यांचे डोळे काहीकाळ पाणावलेले दिसून आले. उपस्थिती स्वामी, समाज, माता भगिनी आणि पत्रकारांच्या आग्रहाखातर त्यांनी पाणी घेतले.