सफाई महिला कर्मचाऱ्यांबरोबरच फ्रंटलाईन महिला कर्मचाऱ्यांची महापौरासमवेत मोफत मेट्रो सफर – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

0
262

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) :- जागतिक महिला दिनानिमित्त आज मंगळवार दि. ०८ मार्च २०२२ रोजी भाजपा पिंपरी चिंचवड च्या वतीने शहरातील महिलांना संपुर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या संधीचा सायंकाळी ६ वा. पर्यंत ५३०० महिलांनी लाभ घेतला. शिवाय सायंकाळी ६ नंतरही मेट्रो सफर करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

यामध्ये प्रामुख्याने फ्रंटलाईन महिला कर्मचाऱ्यांबरोबरच सफाई कर्मचारी व शहरातील इतर महिलांचाही समावेश असल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आज स. ७.३० वा. शहरातील महिलांची पहिली मेट्रो सफर झाली. या महिलांसमवेत महापौर उषा उर्फ माई ढोरे व उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे तसेच सन्मा. नगरसेवक/नगरसेविका यांनी सहभाग घेतला. त्यानंतर दिवसभरात वेळ मिळेल त्याप्रमाणे महापालिकेतील महिला कर्मचारी, फ्रंटलाईन महिला कर्मचारी, सफाई कर्मचारी व शहरातील विविध भागातुन मेट्रो सफर करण्यासाठी महिलांनी उत्स्पुर्तपणे सहभाग घेवुन या मोफत मेट्रो सफरचा आनंद घेतला. महिलांची कोणतीही गैरसोय होवु नये यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने महिलांसाठी मेट्रो प्रवासाचे अगोदरच नियोजन करुन ठेवले होते व दिवसभर भाजपाचे सन्मा. नगरसेवक/नगरसेविका त्याचप्रमाणे कार्यकर्ते नियोजनासाठी मेट्रो स्टेशनवर जातीने उपस्थित राहुन महिलांना मार्गदर्शन करीत होते. अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.