सगळीच रसायने चांगली नसतात; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
359

नाशिक,  दि. २७ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडे  वॉशिंग पावडर नाही,  तर डॅशिंग रसायन आहे,  असे म्हटले आहे. यावर सगळीच रसायने चांगली नसतात, असा पलटवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.   

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,   तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण तोच माणूस तुमच्याकडे आला तर साफसुथरा आणि चांगला होतो. अशी कसली वॉशिंग पावडर तुमच्याकडे आहे की, धुवून माणूस साफ होतो.

मी सायन्स स्टुंडट आहे. सगळीच रसायने चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायने नको, कीटकनाशके नको म्हणतात.  महिला रसायने असलेल्या भाज्या नको म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनाचा विकास हवाय की आम्ही केलेला विकास पाहिजे, याचा विचार करायची वेळ आली आहे, असे सुळे म्हणाल्या.