संपत्तीच्या कारणावरून बहिणीकडून वृद्ध भावाला मारहाण; बहिण, भाचीसह चौघांवर गुन्हा दाखल

0
474

भोसरी, दि.३१(पीसीबी) -संपत्तीच्या कारणावरून वृद्ध भावाचा पाठलाग करून बहिण आणि तिच्या मुलीने दोन अनोळखी व्यक्तींच्या मदतीने भावाला मारहाण केली. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास फुलेनगर एमआयडीसी भोसरी येथे घडली.

नंदू गिरीधर पवार (वय 65, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुसुम वसंत वाघ (वय 62), सुषमा संतोष उबाळे (वय 39, दोघी रा. नेहरूनगर, पिंपरी), दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुसुम ही फिर्यादी पवार यांची बहिण आहे. तर आरोपी सुषमा ही आरोप कुसुम यांची मुलगी आहे. 28 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून लांडेवाडी मार्गे पिंपरी तलाठी कार्यालयात जात होते. त्यावेळी आरोपींनी पवार यांचा पाठलाग केला. ते एमआयडीसी भोसरी येथील फुलेनगर मधील एम क्युअर कंपनी समोर आले असता आरोपी कुसुम आणि सुषमा यांच्या प्रत्यक्ष सांगण्यावरून दोन अनोळखी व्यक्तींनी पवार यांना लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.