संत तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांना भेट वस्तूंचे वाटप

0
190

पिंपरी,दि.०९(पीसीबी) – चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर्स लि. कंपनी व कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत जगतगुरु संत तुकोबारायांच्या पालखीतील, वारकऱ्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. कृतज्ञतेची भावना हि मनुष्यास मिळालेली देणगी आहे… त्याचा वापर त्याने योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित असते.समाजाला मदत करणे हेआपले प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. याच सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून गरवारे टेक्निकल फायबर्स लि.हि कंपनी विविध पातळ्यांवर मदतीचा हात पुढे करत असते.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील कंपनीच्या वतीने वारीत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना, त्यांच्या शेती कामासाठी व पशुधन बांधण्यासाठी उपयोगी येणाऱ्या दोरखंडाचे वाटप करण्यात आले..यासोबत गरवारे कामगार संघटनेकडून वारीत सहभागी वारकऱ्यांना बिस्कीट,राजगिरा लाडू व चिक्कीचे वाटप करण्यात आले. याकरिता गरवारे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री जयवंतराव खाटपे व जॉइंट सेक्रेटरी श्री राजेंद्र आढाव,त्यांच्या वीस लोकांच्या टीमसह अकलूजच्या पुढे “म्हाळुंग” (पालखी विसावा) या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होते.

यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील भेटवस्तू व बिस्किटाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी म्हाळुंग गावचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष श्री भीमराव रेडे पाटील यांचे हस्ते अध्यक्ष,जयवंतराव खाटपे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र आढाव व शाम कुंभार यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..त्यावेळी म्हाळुंग गावचे सामाजीक कार्यकर्ते पहिलवान श्री तेजस रेडे पाटील, श्री नागनाथ शिंदे व तुकोबारायांच्या पालखी रथाला ज्यांची बैलजोडी असते ते वाकडचे शेडगे पाटील व त्यांचे सहकारी अशी बरीच मान्यवर मंडळी यावेळी गरवारे टीमसोबत उपस्थित होती. यावेळी अध्यक्ष जयवंतराव खाटपे व शाम कुंभार यांनी पोलीस उपअधीक्षक श्री निलेश घट्टे साहेब श्री भीमराव रेडे पाटील व श्री शेडगे यांना गरवारे कंपनीबद्धल थोडक्यात माहिती सांगितली.

कंपनी व संघटना वेळोवेळी अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात याची उपस्थित सगळ्यांना कल्पना दिली. उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी सर्व टीमचे आभार मानताना,गरवारे टीमने दरवर्षी वारीमध्ये येऊन आमच्या गावी असा उपक्रम घ्यावा व आम्हाला सेवेची संधी मिळावी असे सांगितले.
भेट वस्तू वाटपाचा हा सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्धल पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक श्री निलेश घट्टे साहेब यांनी गरवारे टीमचे कौतुक केले.

संघटनेचे सभासद नितीन झेंडे, संजय लिंबोणे, प्रवीण डावरे, श्री रमेश दातीर,महेश शेटे, प्रमोद पाटील , राजेंद्र साठे दत्तात्रय चौरे किशोर रडे,सुनील मोहिते बाळासाहेब रिकामे,संजय पवार,अविनाश आढाव,सुभाष ढोरे, भाऊसाहेब लोंढे काळूराम गायकवाड,नितीन तारू,मधुकर पळसे व वसंत चव्हाण या मित्रांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापण अधिकारी, श्री प्रबोध कामत, श्री विवेक कुलकर्णी शिवराईकर.संजय पाटील ,विलास आरेकर राहुल बारावकर, ,गणेश भोसले, निशांत जाधव यांनी सहकार्य केले.