संतापजणक: कासारवाडीत आंध वृध्देची जमिन लिहून घेत केली फसवणुक

0
399

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – एका अंध वृध्देला सरकारी पेन्शन सुरु करण्याचे आमिष दाखवून चौघाजणांनी मिळून त्याची जमिन लिहून घेतली. तसेच ती जमिन विकली. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.५ डिसेंबर २०१७) ते सोमवार (दि.२२ जानेवारी २०१८) दरम्यान कासारवाडी येथे घडली.

रंजनाबाई रेवाशंकर दवे (वय ५९, रा. चंद्रकांत लांडगे चाळ, कासारवाडी) असे फसवणुक झालेल्या या अंध वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी बुधवार (दि.२४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोहनलाल दयरुपचंद दवे, अर्जुन मोहनलाल दवे (दोघे.रा. ५०३, बुधवार पेठ, पुणे), विलास विष्णुदत्त दवे (रा. ४८८, गणेश पेठ, दगडी नागोबा मंदिराशेजारी, पुणे) आणि दिनेश शंकरलाल पुरोहित (रा. सोमता, ता. जसवंतपुरा, जि. जालोर) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बुधवार (दि.५ डिसेंबर २०१७) ते सोमवार (दि.२२ जानेवारी २०१८) या कालावधीत कासारवाडीत राहणाऱ्या रंजनाबाई या वृध्द अंध महिलेला  सरकारी पेन्शन सुरु करुन देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका वकिला मार्फत लिहून घेतली. आणि त्यांना कुठल्याही प्रकारची सुचना न देता ती जमिन विकली. तसेच त्या बदल्यात कुठल्याही प्रकारचा मोबदला आरोपींनी वृध्देला दिला नाही आणि त्यांची फसवणुक केली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गाडे तपास करत आहेत.