संजय राऊत यांच्या नातेवाईकाला ‘ईडी’ची नोटीस

0
254

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी नुकतीच ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

नितेश राणे म्हणाले, “प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू आहेच. मात्र माझ्या माहितीप्रमाणे हे सुरु असतानाच याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.”
संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटीस मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करतायत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे. राणे पुढे म्हणाले, “ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे.”

दरम्यान, शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांना ईडी ची नोटीस गेल्याचे समजते. प्रताप सरनाईक यांच्याकडील ईडी च्या छाप्यात मोठ्या रकमेचे मनी लॉन्ड्रिंग असल्याची चर्चा असून अन्य नेतेसुध्दा याच पध्दतीने व्यवहारात सापडतील असे सांगण्यात येते.