संकटकाळामध्ये तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिलेल्या शिवसेनेलाच तुम्ही फसवले

0
350

मुंबई, दि.५ (पीसीबी) – सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. संजय राऊत यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याबाबत त्यांची भूमिका काय आहे असा प्रश्न विचारातच ते म्हणाले ‘असला प्रकार माझ्याकडे नसतो, असे सांगत भाजपासोबतच्या युतीची शक्यता साफपणे फेटाळली.तसेच जे करायचे ते दिलखुलासपणे, जेव्हा सोबत होतो तेव्हा दरवाजाबाहेर गेलात का? तुम्ही स्वतः गेलात. तुम्ही दरवाजा बंद करून बसलात,असे ठाकरे यावेळी म्हणाले.

तुम्ही कोणाला फसवलंत? जो माणूस संकटकाळामध्ये तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिला. हिंदुत्वावरची सगळी आक्रमणे होती, धोके होते ते त्यांनी स्वतःवरती घेतले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाबरोबर तुम्ही एकत्र राहू शकत नाही? भाजपाने विश्वासघात केला, असंच आता म्हणावं लागेल. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललले आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसले हिंदुत्व आहे, अशी जोरदार टीकाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.