शॉक लागून कामगाराचा मृत्यू

0
231

चिखली, दि. १८ (पीसीबी) – फॅब्रिकेशनचे काम करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 12 जुलै रोजी सकाळी सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, गणेशनगर तळवडे येथे घडली.

दीपक निकम (वय 25) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. दीपक यांच्या आईने मंगळवारी (दि. 17) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागेश वाघमारे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, गणेशनगर तळवडे येथे श्री भालेकर यांच्या वर्कशॉपचे गेट बसविण्याचे काम आरोपी नागेश वाघमारे याने घेतले होते. वाघमारे यांच्याकडे मयत दीपक काम करत होता. 12 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फॅब्रिकेशनचे काम करत असताना लोखंड कटिंग मशीनच्या वायरचा शॉक लागला. यामध्ये दीपकचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.