शेवटी पेट्रोलने ‘सेंचुरी’ मारलीच; ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०० रुपये १३ पैशांवर

0
210

राजस्थान, दि.१७ (पीसीबी) : कोरोनामुळे लोक आधीच हैराण आहेत आणि आता त्यामध्ये पेट्रोल दरवाढ झाल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने सेंचुरी गाठली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेटानुसार, नॉन प्रीमिअम पेट्रोलची रिटेल किंमत प्रतिलीटर १०० रुपये १३ पैसे इतकी झाली आहे. देशभरातील पेट्रोल दरांमधील हा उच्चाकं आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर ९२ रुपये १३ पैसे इतका झाला आहे.

तर महाराष्ट्रात मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ झाली आहे. यासोबतच पेट्रोलचा दर आज प्रतिलीटर ९६ रुपयांवर पोहोचला आहे.

तर दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत २५ पैशांनी वाढली आहे. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. आतापर्यंत २० वेळा २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एकूण ५ रुपये ५८ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५ रुपये ८३ पैसे इतकी वाढ झाली आहे.