शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा होणार; अर्थमंत्री गोयल यांची घोषणा

0
922

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – मोदी सरकारच्या वतीने आज  (शुक्रवार) संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. सकाळी अकरा वाजता हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा करणार, अशी घोषणा  गोयल यांनी यावेळी केली.

अर्थमंत्री अरूण जेटली कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. त्यामुळे  गोयल यांच्याकडे  हंगामी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गोयल  आज  भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नावाची ही योजना  असून याची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१८ पासून केली जाणार आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत हा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचा लाभ देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे आहे. हे लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पात लोकानुयी तरतुदी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरुण जेटली  यांच्या अनुपस्थितीत रेल्वे मंत्री पियुष गोयल  अर्थसंकल्प सादर करत आहेत.