शेअर ट्रेडिंगमधून एका वर्षात दुप्पट पैसे देतो असं म्हणत ‘त्याने’ केली लाखोंची फसवणूक

0
227

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कर, एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक केल्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनुप पुरूषोत्तम कदम (वय 42, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 13) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रीरंग मुळे (रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर ) व नितेश सावंत (रा. सिंहगड रोड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 2018 मध्ये फिर्यादी अनुप यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कर, एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी अनुप यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने सुमारे 13 लाख 55 हजार रूपये घेऊन ते परत न देता फसवणूक केली. पोलीस उपनिरिक्षक गवारी अधिक तपास करीत आहेत.