शुभमन गिल, महंमद सिराजने सार्थ ठरविली निवड

0
424

मेलबर्न, दि.२९(पीसीबी) : दुसऱ्या कसोटी सामन्यात पलटवार करताना ऑस्ट्रेलियावर विजय मिळविल्यावर भारताचा बदली कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला देताना शुभमन गिल आणि महंमद सिराज यांच्या पाठिवर शाबासकीची थाप दिली. सामन्यानंतर बोलताना रहाणे म्हणाला,’प्रत्येक खेळाडूने आपपले योगदान दिले. यातही पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल आणि महंमद सिराज यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक आहे. पहिलाच कसोटी सामना खेळताना त्यांनी आपल्या भोवती सामना फिरवला. त्यांनी आपली गुणवत्ता आणि निवड सार्थ ठरविली. ‘

लाजिरवाण्या पराभवानंतर दहा दिवसात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत सर्व संघाला एकत्र आणून साकार केलेल्या विजयाने रहाणे हरखून गेला होता. तो म्हणाला,’मला प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. गिर आणि सिराज यांचे मला विशेष कौतुक आहे. अॅडलेडवरील पराभव ताजा असतानाच दडपणखाली या दोघांनी केलेली कामिगरी नक्कीच कौतुकास्पद आहे.’

खेळाडू कशी कामगिरी करतात आणि आव्हानाला कसे सामोरे जातात हे माझ्यासाठी महत्वाचे होते, रहाणे म्हणाला,’दडपणाखाली प्रत्येक वेळेस खेळ उंचावतो असे नाही. पण, या वेळी भारतीय खेळाडूंनी ते मनावर घेतले. फलंदाजीत गिल आणि गोलंदाजीत सिराजने महत्वपूर्ण भमिका बजावली. विशेषतः दुसऱ्या डावात दुखापतीमुळे उमेश यादवला मैदान सोडावे लागल्यावर सिराजने खूप शिस्तबद्ध मारा केला. शुभमनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण दर्जेदार खेळ करू शकतो हे त्याने दाखवून दिले. दोघांनाही प्रथम श्रेणीचा अनुभव फायद्याचा ठरला. रवींद्र जडेजाचीहीअष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. ‘

उमेश यादवच्या पोटऱ्या दुखावल्या असून, तो तंदुरुस्त होत आहे. त्याच्या तंदुरुस्ती विषयी संघ व्यस्थापन आणि वैद्यकीय स्टाफ अंतिम निर्णय घेईल, असेही रहाणे याने सांगितले.