शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे २१ व्या शतकातील आश्चर्य आहे – सुधीर मुनगंटीवार

0
320

मुंबई,दि.३०(बीपीसी) – भाजपचे नेेते सुधीर मुनगंटीवार यांनी “शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे २१ व्या शतकातील आश्चर्य आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाल्याप्रमाणे फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरुन ते सत्तेत गेले” अस वक्तव्य केलं आहे. नांदेडमध्ये ते बोलत होते.

‘देर आये दुरुस्त आये, सुबह का भुला श्याम को आया’ आम्ही असं समजू. मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्ताव देखील मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आत्ताही शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.