शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

0
521

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे आज (रविवार) वाटप केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले आहे.  

शिवसेनेने पहिल्या यादीत   नाशिक जिल्ह्यातील चारही आमदारांना एबी फॉर्म दिले आहेत. यामध्ये सिन्नरमधील राजाभाऊ वाजे, मालेगावमधून दादा भुसे, निफाडमधून अनिल कदम आणि देवळालीमधून योगेश घोलप यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

तसेच संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६ विद्यमान आमदारांना पुन्हा  उमेदवारी देण्यात आली आहे.