शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेंनी घेतली राजू शेट्टींची भेट

0
405

कोल्हापूर, दि. २९ (पीसीबी) – हातकणंगले मतदारसंघातून  विजयी झालेले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  नेते व खासदार राजू शेट्टी यांची आज (बुधवार) त्यांच्या निवासस्थानी  भेट घेतली .  माने यांनी राजू शेट्टी यांचाच पराभव करत विजय मिळवला आहे. पण  निवडणुकीतील सर्व मतभेद विसरत धैर्यशील माने राजू शेट्टींच्या भेटीसाठी त्यांच्या घऱी पोहोचले. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्या आईचे आशिर्वाददेखील घेतले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी राजू शेट्टींचा पराभव केला ते धैर्यशील माने आज त्यांच्या घरी जाऊन  भेट घेतली.

धैर्यशील माने माझ्या नातवासारखे आहेत. जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा’,  असा आशीर्वाद यावेळी राजू शेट्टींच्या आईंनी धैर्यशील माने यांना दिला. धैर्यशील माने माझ्या घरी आल्यामुळे खूप आनंद झाला. त्यांनी लोकसभेत चांगले प्रश्न मांडावेत, असे राजू शेट्टी    यावेळी म्हणाले.