शाहूनगरमध्ये चोरट्यांनी घरात प्रवेश करताच…

0
254

शाहूनगर, दि. 6 (पीसीबी) : शाहूनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी रॉड तोडून घरात प्रवेश करून रोकड व चांदीचा हार चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री आठ ते शनिवारी (दि.  5) सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली.

मनोज राजाराम भुजबळ (वय 43, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुजबळ यांचे घर शुक्रवारी (दि. 4) रात्री आठ ते शनिवारी (दि.  5) सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी किचनच्या खिडकीचे लोखंडी रॉड तोडून घरात प्रवेश केला. घरातून रोख रक्कम व चांदीचा हार असा एकूण 90 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.