शाळेवर झालेल्या हल्ल्यात २१ लहान मुलांचा गोळीबारात मृत्यू

0
465

वॉशिंगटन, दि. २५ (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टेक्सासमधल्या शाळेवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या शाळेवर झालेल्या हल्ल्यात २१ लहान मुलांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. अमेरिकेने आता या हिंसक शक्तींच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन यानिमित्ताने राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलं आहे.

व्हाईट हाऊस इथून बायडन यांनी टेक्सासमधल्या हल्ल्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. या हिंसक शक्तींच्या विरोधात आपण कधी आवाज उठवणार आहोत? प्रत्येक पालकाने, या देशातल्या प्रत्येक नागरिकाने केवळ दुःख न वाटून घेता, ही घटना लक्षात ठेवून त्याविरोधात कृती करावी. निवडून दिलेल्या प्रत्येक प्रतिनिधीला हे लक्षात आणून द्यायला हवं की आता काहीतरी करण्याची वेळ आलीये, असं बायडन म्हणाले आहे.

अमेरिकेतल्या एका शाळेत घुसून एका व्यक्तीने केलेल्या बेछुट गोळीबारात शाळेतल्या २१ लहान मुले ठार झाली आहे. त्यासोबतच तीन शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे. तर शाळेतले काही कर्मचारी आणि पोलीसही जखमी झाले आहे. पोलिसांसोबतच्या झटापटीत हल्लेखोरही मारला गेल्याचं वृत्त हाती येत आहे.

हा हल्लेखोर १८ वर्षांचा असून याच शाळेचा माजी विद्यार्थी होता. याने हल्ल्याआधी आपली गाडी शाळेच्या बाहेर लावली आणि त्यानंतर बंदूक घेऊन आत घुसत त्याने बेछुट गोळीबार केला.