शहरात आज कोरोना बाधित 154 वाढले

0
429

पिंपरी, दि.26 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 143 आणि महापालिका हद्दीबाहेरील 11 अशा 154 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर बोपखेल येथील 65 वर्षीय महिला, रमाबाईनगर पिंपरीतील 60 वर्षीय पुरुष आणि सिंहगड रोड, पुणे येथील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 2405 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील अजंठानगर, जयभीम नगर दापोडी, पवारनगर थेरगाव, गांधी वसाहत नेहरुनगर, भाटनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, कुलदिप अंगण नेहरुनगर, संत तुकाराम नगर भोसरी, साईपार्क नेहरुनगर, डांगे थेरगाव, एचडीएफसी कॉलनी चिंचवड, भोईर ब्रीज आकुर्डी, चिखली रोड, केशवनगर कासारवाडी, आनंदनगर चिंचवड, घरकुल, नव महाराष्ट्र स्कुल पिंपरी, कृष्णानगर चिंचवड, धावडेवस्ती भोसरी, नाशिक फाटा कासारावाडी, रमाबाईनगर पिंपरी, गांधीनगर, बोपखेल गाव, मोरेवस्ती चिखली, तापकीरनगर काळेवाडी, दळवीनगर, बौध्दविहार दापोडी, सिध्दार्थ कॉलनी काळेवाडी, विठ्ठलनगर, कस्पटेवस्ती वाकड, तुळजाई कॉलनी थेरगाव, मिलींदनगर पिंपरी, जयगणेश साम्राज्य भोसरी, जाधव पार्क आकुर्डी, पदमजी पेपर मिल थेरगाव, महात्मा फुलेनगर चिंचवड, साने वस्ती चिखली, नटराज सोसायटी नेहरुनगर, निगडी प्राधिकरण, पवारनगर जुनी सांगवी, संभाजीनगर भोसरी, श्रीनगर थेरगाव, रिव्हर रोड पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, वडमुखवाडी, महाडा बिल्डिंग पिंपरी, महिंद्रा बिल्डिंग पिंपरी, राजे शिवाजीनगर चिखली, ग्रीन एम्पायर चिखली, हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी, काटेपुरम नवी सांगवी, पाटीलनगर चिखली, ममता नगर सांगवी, पिं. सौदागर, काळजेवाडी च-होली, दोस्ती बेकरी नेहरुनगर, विशालनगर, साईबाबानगर चिंचवड, रामनगर रहाटणी परिसरातील 143 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 81 पुरुष आणि 62 महिलांचा समावेश आहे. तर, मॉडल कॉलनी शिवाजीनगर, बोपोडी, सिंहगड रोड, देहुगाव, बिबेवाडी, दत्तवाडी, गोखलेनगर, पुणे येथील येथील 6 पुरुष आणि 5 महिला अशा 11 जणांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर,दत्तनगर दिघी, डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, इंदिरानगर चिंचवड, सोनगिरा काळेवाडी, निगडी प्राधिकरण, विद्यानिकेतन स्कुल निगडी, वडमुखवाडी, बौध्दनगर, तापकीरनगर मोशी, रमाबाईनगर पिंपरी, दापोडी, अजंठानगर, भाटनगर, ओटास्किम निगडी, नढेनगर काळेवाडी, आनंदनगर चिंचवड, गुलाबनगर दापोडी, मराठी शाळेजवळ कासारवाडी, सोनवणे वस्ती चिखली, वाकड, विनायकनगर पिंपळे गुरव, सिध्दार्थ नगर दापोडी, विशालनगर ‍पिंपळे निलख, शिंदेनगर सांगवी, ‍पिंपळे सौदागर, नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, भोसरी, डिलक्स चौक पिंपरी, त्रिमुर्ती नगर चिंचवड, बोपखेल, हनुमानगर ताम्हाणेवस्ती, काटेपुरम चौक पिंपळे गुरव, देहुरोड, सेक्टर २५ निगडी, नाणेकर चाळ पिंपरी, शिवशाहीनगर दिघी, श्री स्वामी कॉलनी थेरगाव, कासारवाडी, सीएमई दापोडी, आंबेगाव, येरवडा, कल्याणीनगर, कोथरुड, शिरपुर धुळे येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 117 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 2405 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1443 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 41 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 27 अशा 68 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 919 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.