शहरातील या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या..

0
287

पुणे, दि. 24 (पीसीबी): गेले अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे तसेच पिंपरी चिंचवडमधील रामनाथ पोकळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पिंपरीतील पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांना पदोन्नती मिळाली आहे. त्याचवेळी बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक राजेंद्र डहाळे यांची पुणे शहर पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) म्हणून बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी व कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे
अशोक मोराळे (अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर)
रामनाथ पोकळे (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग), ठाणे शहर)
डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)
सुधीर हिरेमठ (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, पुणे, पदोन्नतीने)
राजेंद्र डहाळे (पोलीस उप महानिरीक्षक, बिनतारी संदेश ते अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), पुणे शहर)