शहरातील ‘या’ भागांतून सहा दुचाकी तर तळेगाव दाभाडे मधून कार चोरीला

0
405

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – वाहन चोरांचा वाहने चोरण्याचा सपाटा सुरु असून आणखी सात वाहने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यात सहा दुचाकी तर एका कारचा समावेश आहे. तळेगाव दाभाडे शहरातून कार तर पिंपरी, भोसरी, वाकड, चिखली मधून सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात एकूण तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालून अज्ञात चोरट्यांनी 30 हजारांची मोपेड (एम एच 14 / ई क्यू 5669) आणि 35 हजारांची हिरो होंडा प्रो (एम एच 14 / एच एल 8370) अशा दोन दुचाकी चोरून नेल्या. याबाबत भारती दत्तात्रय काजळे (वय 40, रा. भोसरी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पाच हजारांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एम एच 14 / ए के 9769) बुधवारी (दि. 20) सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास भोसरी येथील चक्रपाणी वसाहत मधून चोरून नेली आहे.

पिंपरी मधून 10 हजारांची बॉक्सर दुचाकी (एम एच 14 / यु 0227), वाकड मधून 30 हजारांची पॅशन प्रो दुचाकी (एम एच 14 / डी सी 9832) चोरीला गेल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 30 हजारांची होंडा दुचाकी (एम एच 14 / ई एन 6409) अज्ञात चोरट्यांनी राजे शिवाजीनगर, प्राधिकरण चिंचवड येथील एका सोसायटीच्या समोरून चोरून नेली आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे शहरातील सोमवार पेठेतून चार लाखांची टाटा सुमो कार (एम एच 14 / एफ एम 5804) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. अमित अजित उनकुले (वय 44) यांनी त्यांची सुमो कार घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी कारचे लॉक तोडून कार चोरून नेली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.