शरद पवार संतापले आणि म्हणाले “इनफ इज इनफ”

0
367

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं पत्र तथ्यहीन असल्याचं सांगितलं. गृहमंत्री फेब्रुवारीच्या 15 ते 27 या तारखेपर्यंत हे कोरोनामुळे विलगीकरणात होते, असं शरद पवारांनी सांगितलं. मात्र, यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगितलं की शरद पवार हे 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत होते. तसा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊण्टला आहे. यावर शरद पवार संतापले आणि म्हणाले “इनफ इज इनफ”.

नेमकं काय घडलं?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले.

सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरुन 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वॉरंन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता, असं शरद पवारांनी सांगितलं.

शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारीचा पत्रकार परिषदेतील व्हिडीओ शेअर एक ट्वीट केलं. देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत विचारलं, “15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”