“शरद पवार वडिलांच्या वयाचे, त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे”

0
473

मुंबई,दि.११(पीसीबी) – शरद पवार वडिलांच्या वयाचे, त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. टीव्ही९ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“शरद पवारांचं जे म्हणणं आहे मी ऐकलं. मी विदर्भातला आहे, मी समुद्राची पाहणी करायला चाललो आहे. मात्र मी अनेकदा बारामतीत गेलो आहे. मात्र तिथे मला काही समुद्र दिसला नाही,” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. “जर आपल्याला बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं असेल तर तेंडूलकर आणि गावस्करला प्रशिक्षण द्यावं अशी अट नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. जर माझे वडील असते तर ते त्याच वयाचे असते. शेवटी प्रत्येक बापाला हेच वाटतं की, आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजतं. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तिचं भावना असते,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, कदाचित पवारांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे आणि काही तरी करा असे सांगायचं असेल,” असेही ते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.