शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी -चंद्रकांत पाटील

0
441

पुणे, दि. २ (पीसीबी) – सध्या भाजपात जोरात मेगा भर्ती चालू आहे. या मेगा भर्ती सगंळे उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत. अशी एक मेगा भर्ती १० ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी, असा इशारा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीतून बरेच मोठे नेते लवकरच भाजपवासी होणार असल्याचे संकेतच दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेत होणारी आवक चांगलीच वाढली आहे. यामुळे आघाडीला घडीघडीला मोठमोठे धक्के बसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाटलांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीची धकधक वाढवणारे आहे. सत्तेत असताना शरद पवारांनी छगन भुजबळ आणि गणेश नाईकांना ईडीची भिती दाखवून राष्ट्रवादीत आणले का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. पुण्यातल्या पत्रकार ते परिषदेत बोलत होते.