शरद पवारांची विधानसभेची तयारी; १ जूनला प्रमुख नेत्यांची बोलावली बैठक

0
497

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा केवळ एक उमेदवार जिंकून आला. तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. हा दारूण पराभव बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक  १ जूनला  बोलावण्यात आली  आहे. यशवंतराव चव्हाण भवनात सकाळी ही  बैठक होणार आहे.  सकाळच्या सत्रात पक्षातील प्रमुख नेत्यांची तर दुपारच्या सत्रात आमदार-खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक होणार आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर अमरावतीत राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत कौर राणा यांनी स्वत:च्या करिष्म्यावर  विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीतील  पराभवावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागात दौरा सुरू केला आहे. या प्रश्नांवर पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.