शरदराव पवार, आधी याचे उत्तर द्या – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आव्हान

0
416

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ५ ऑगस्ट ठरला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते हा शिलान्यास अयोध्येला राहणार आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कठोर शब्दांत टीका करताना, मंदिर बांधून कोरोना जाणार असेल तर माझी हरकत नाही, अशी प्रतिक्रीया दिली. पवार यांच्या या विधानाचा समाचार घेताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज एक व्हिडिओ क्लिप जारी केली. सोमय्या यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या भयानक परिस्थितीचे वर्णन करून शरद पवार यांना काही प्रश्न केले आहेत. त्यात आपले सरकार असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना सेंटरला आग लागली आहे. तिथे कोरना सेंटरला रुग्ण आत्महत्या करतात, महिलांची छेडछेड होते, पेशंट गायब होतात आधी त्याचे उत्तर द्या, असे थेट आवाहन केले आहे .

देशात गेली ३० वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्याला आता कुठे मुहूर्त मिळाला. केंद्र सरकारने त्याबाबत काल जाहीर केले. त्यामुळे आता राम जन्मदिनाच्या कामाला आरंभ होणार आहे. त्याच विषयावर शरद पवार यांनी सोलापूर दैऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना केंद्रसरकार, भाजपचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. देशात कोरोना साथीने थैमान घातलेले असताना राम मंदिर हा मुद्दा पुढे आला. पण राम मंदिर बांधून कोरोना जाणार असेल तर माझी हरकत नाही, असे म्हणत पवार यांनी आपला विरोध प्रकट केला. त्यामुळे भाजप आणि विरोधक अशी जुगलबंदी सुरू झाली आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या म्हणतात, राम जन्मभूमिवर रामाचे भव्य मंदिर होणार आहे. दुर्दैवची गोष्ट अशी की, काही आमच्या इथल्या काही नेत्यांना हिंदुंचे श्रध्दास्थान असलेल्या रामाच्या मुद्यावर चेष्ठा कऱण्याची सवय लागली आहे. पण शरद पवार यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की, महाराष्ट्रात आपले सरकार आहे. इथे कोरोनाची आग लागली आहे. राज्यात तीन लाख पेशंट झालेत. कोरोना सेंटरमध्ये आत्महत्या होतात, महिलांची छेडछेड होते, पेशंट गायब होतात आधी त्याचे उत्तर द्या.