“व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेडवर जास्त लक्ष द्यावे लागणार”

0
223

पुणे, दि. १० (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर राज्यात वीकेंड लॉकडाऊन आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा पुण्यातील परिस्थितीचा आज आढावा घेतलाय. पुण्याचे महापौरांसह अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणची आढावा बैठक घेतली. कुठल्याही प्रकारचे राजकारण आणून नका, असे कळकळीचे आवाहन अजित पवार यांनी केले.

त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. प्रकाश जावडेकरांनी जेवढी व्हॅक्सिनची गरज असेल, तेवढ्या व्हॅक्सिन केंद्राकडून देण्याचा निर्णय घेतलेला असल्याचं सांगितलंय. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेडवर जास्त लक्ष द्यावे लागेल. ससूनमध्ये 500 बेड्स देण्याचं नियोजन आहे. संचारबंदीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यानं एकमेकांवर टोलवाटोलवी न करता एकमेकांना सहकार्य करावं, असंही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.

पुण्यात जिल्हा आणि दोन्ही शहरं मिळून 1 लाखांच्या लसीकरणाचं टार्गेट
मी, पुण्याचे महापौर असे आम्ही सगळे मिळून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणची आढावा बैठक दर आठवड्याला घेतो, त्याप्रमाणे आजही घेतली. प्रकाश जावडेकरांनी केंद्राशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांबद्दल विभागीय आयुक्त, पीएमसी आणि पीसीएमची आयुक्त, कलेक्टरकडून माहिती घेतली, असंही अजित पवार म्हणालेत. पुण्यात जिल्हा आणि दोन्ही शहरं मिळून 1 लाखांच्या लसीकरणाचं टार्गेट ठेवलं होतं. 85 हजारांपर्यंतच उद्दिष्ट एक दिवस आपण गाठलं. परंतु त्यानंतर व्हॅक्सिन कमी पडलं. पुढच्या गोष्टी करता आल्या नाहीत.