वॉकिंगसाठी निघालेल्या व्यक्तीचा मोबईल हिसकावला

0
272

भोसरी, दि.१७(पीसीबी) – सायंकाळच्या वेळी वॉकिंगसाठी निघालेल्या एका व्यक्तीचा 50 हजारांचा मोबाईल फोन दुचाकीवरील दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली.

राजेंद्र रंगनाथ कुलकर्णी (वय 48, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता वॉकिंगसाठी जात होते. इंद्रायणी नगर येथील स्वामी समर्थ शाळा ते संतनगर चौकदारम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा 50 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.