विश्वास नांगरे पाटील यांना कोरोना, आणखी बडे अधिकारी बाधित..

0
206

मुंबई , दि. १० (पीसीबी) : राज्यात कोरोना विषाणूच्यारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना पोलीस देखील कोरोनाबाधित होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे पुण्यात गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झालाय.

कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असून मुंबई पोलीस दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह संदीप कार्णिक, सत्यनारायण चौधरी, अतुल पाटील, दिलीप सावंत या चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांना कोरोा झाला आहे.
13 पोलीस उपायुक्तांना कोरोना
एन . हरीबालाजी ( डीसीपी ) झोन 1
गीता चौहान ( डीसीपी ) पोर्ट झोन
सोमनाथ घारगे ( डीसीपी ) झोन 12
दत्ता नालावड़े (डीसीपी ) अँटी नार्कोटिक सेल
प्रकाश जाधव ( डीसीपी ) क्राइम
नितिन पवार ( डीसीपी) ट्राफिक वेस्ट
सुनील भारद्वाज ( डीसीपी ) LA4
एन अम्बिका ( डीसीपी )
विशाल ठाकुर (डीसीपी ) झोन 11
नियति ठाकर ( डीसीपी ) SB 2
बालकृष्ण यादव ( डीसीपी ) वायरलेस
विजय पाटील ( डीसीपी) झोन 4
मंजूनाथ सिंगे ( डीसीपी ) झोन 4