हरियाणा,दि.०२(पीसीबी) – समदृष्टिच्या भावनेचे दर्शन घडविणाऱ्या ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ दिनांक १६ नोव्हेंबर रोजी होत असून हा समागम २० नोव्हेंबर पर्यंत भव्य दिव्य स्वरूपात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा ग्राउंड (हरियाणा) येथे आयोजित केला जात आहे. संत समागमाची पूर्व तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वयमेव एक ऐतिहासिक व अनोखा आहे. कारण या दिव्य संत समागमांच्या अविरत श्रृंखलेने आजवर ७४ वर्षे यशस्वी रित्या पूर्ण केली आहेत.
भारतवर्षात सध्या सणासुदीचे दिवस असतानाही मोठ्या संख्येने निरंकारी भाविक भक्तगण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावत असतानाच संत समागमाच्या सेवांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. सद्गुरु माताजीदेखील समागम स्थळावर चालू असलेल्या संपूर्ण कार्यकलापांचे सातत्याने अवलोकन करत असून समागम स्थळी होणाऱ्या त्यांच्या पावन दर्शनांनी सेवारत असलेले सर्व भक्तगण स्वतःला धन्य समजत आहेत. आपल्या सद्गुरूंच्या दिव्य दर्शनाने भक्तांमध्ये सुद्धा सेवेचा नवा उत्साह संचारला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आध्यात्मचे हे अलौकिक दृश्य पाहून असे वाटते, की समागम सेवांमध्ये भाग घेणारा प्रत्येक भक्त दिव्यत्वाचे वातावरण अनुभवत क्षणोक्षणी भक्तिरंगात रंगून जात आहे.
या वर्षी ७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमात भारत तथा विदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी होतील.समागम स्थळावर भव्य सत्संग पंडाल च्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहे ज्यामध्ये बाहरून येणाऱ्या भक्तगणांची राहण्याची तसेच लंगर (भोजन) इत्यादिची उचित व्यवस्था असेल. शिवाय प्रत्येक मैदानावर स्वतंत्र कैन्टीनची सुविधा दिली जाणार आहे. त्यामध्ये अल्पोपहार इत्यादि सवलतीच्या दराने उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त मैंदानांवर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्या बरोबरच पार्किग, सुरक्षा इत्यादिचीदेखील की समुचित व्यवस्था केली जात आहे. जेणेकरून येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय भासू नये. सत्संग पंडाल च्या आजूबाजूला संत निरंकारी मंडळाचे विविध विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादींची कार्यालयेही असतील. प्रकाशन विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावण्यात येतील. या शिवाय मिशनचा इतिहास व सम्पूर्ण समागम चे मुख्य आकर्षण स्वरूपात निरंकारी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे.
या दिव्य संत समागमात सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी भारतीय रेल्वे द्वारे आध्यात्मिक स्थळ समालखा याच्या निकट असलेल्या भोड़वाल माजरी रेलवे स्टेशनवर तिथून जाणाऱ्या जवळ जवळ सर्व गाड्या थांबवण्याची अनुमती दिली गेली आहे. या सुविधमुळे रेल्वेने समगमला जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे.
या दिव्य संत समागमाचा उद्देश मानवता व विश्व बंधुत्वाची भावना सुदृढ करण्यास तसेच ‘आत्मिकतेत मानवता’ चे महत्व दृगोचर करणे हा असून तो केवळ ब्रह्मानुभूतिच्या माध्यमातून साकार होऊ शकतो.