विवाहित प्रियकर अन् प्रेयसीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

0
472

मोहोळ, दि.२८ (पीसीबी) : विवाहीत प्रियकर आणि प्रियेसीने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोलापूर – पुणे महामार्गावर अर्जुनेसोंड (ता. मोहोळ) येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अश्विनी बिराप्पा पुजारी आणि धनजंय बाळु गायकवाड ( रा.लोणीकंद ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असल्याचे आधारकार्डवरून समजते.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर लांबोटी गावच्या हद्दीत रॉयल – इन – वन रेस्टारंट, लॉजीग, परमीटरुम आहे. येथे सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अश्विनी आणि धनजंय दोघेही येऊन आम्ही हॉटेलमध्ये मुक्काम करणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्यांच्याकडून ओळखपत्र घेऊन त्यांना खोली देण्यात आली होती. दोघेही खोलीत जाताना रात्री 10.00 वाजता आम्हाला जेवन पाठवा, असे सांगितले होते.

त्यानुसार रात्री हॉटेल कामगार माधव सोनसाळे हा जेवणाची आर्डर घेण्यासाठी खोलीजवळ गेला होता. खोलीची बाहेरून बेल वाजवली असता आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्याने खोलीच्या खिडकीतून आत डोकावले असता धनंजय आणि आश्विनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यामुळे सोनसाळे याने धावत कॉऊन्टरला येवून हॉटेल मालकांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी हॉटेल मालक दिनेश गाडे आणि वैभव कदम असे दोघ खोलीजवळ जाऊन पाहिले असता दोघेही गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीसांना घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी खोलीत अश्विनी पुजारी हिने दोरीने आणि धनंजय गायकवाड याने ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

अश्विनी पुजारी व धनंजय गायकवाड हे दोघेही विवाहीत असून त्यांना मुल असल्याचे समजते. प्रेमसंबधातूनच ही घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे. पण त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मोहोळ पोलीस तपास करत आहेत.