विमानातून दिसणारा नाशिकफाटा उड्डाण पूल, कासारवाडी मेट्रो स्टेशनचा फोटो भाजपाच्या अंगलट..

0
2690

– आमदार महेश लांडगे यांच्या फेसबूक पोस्टवर टीकेचा तुफानी भडिमार

 

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – `विमानातून दिसणारे आपले पिंपरी चिंचवड शहर, नाशिकफाटा उड्डाण पूल व मेट्रो स्टेशन कासारवाडी`, या आमदार महेश लांडगे यांच्या फेसबूक अकौंटवरील फोटोवर तब्बल १३४ नागरिकांनी टीकात्मक कमेंट्स केल्या आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांवर असंख्य नागरिकांनीच टीकेचा भडिमार केला आहे. `शेवटी अजितदादांनी केलेली कामेच भाजपा आमदारांना विमानातून दाखवावे लागत आहे…, तुम्ही (भाजपाने) पाच वर्षांत काय केले ते सांगा…,अजितदादांनी एखादी वस्ती, गाव किंवा तालुका नाही तर आख्खे महानगर उभे केलेय..तुमच्या फडणवीस यांना हे नेऊन दाखवा…अशा अत्यंत शेलक्या प्रतिक्रीया या पोस्टवर आल्याने ती पोस्ट आता चर्चेचा विषय ठरतीये..

आमदार महेश लांडगे यांच्या फेसबूक पोस्टवर विमानातून दिसणाऱ्या नाशिकफाटा उड्डाण पुलाचे तसेच मेट्रो स्टेशनचे विहंगम मनमोहक दृष्य या फोटोत दिसते. मेट्रो स्टेशन, नाशिकफाटा उड्डाण पूल, प्रशस्त मगामार्ग हे सर्व भाजपाचेच काम असल्यासारखे या फोटोतून ध्वनीत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, नागरिकांनी या फोटोवरून भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा यथेच्छ समाचार घेतला आहे. कमेंट्स करणारे कोणीही एखाद्या राजकिय पक्षाचे डमी अकौंट होल्डर नाहीत, तर शहरातील सामान्य नागरिक आहेत. त्यातून भाजपा विरोधातील लोकभावना दिसून येत असल्याची चर्चा आहे.
कमेंट्स करणाऱ्यांच्या काही शेलक्या कमेंट्स पुढीलप्रमाणे आहेत – फोटोत दिसणारे अजितदादांचे हे काम आहे…, दूरदृष्टी असलेला कृतिशील विचारांचा गतीशील नेता म्हणजे अजितदादा…, अजितदादांनी एक वस्ती, गाव, तालुका नाही तर आख्खे महानगर उभे केलेय…,पण हे सगळे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांचे आहे, तुमचे (भाजपा) काय ते सांगा की…, अजितदादांनी पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय… शेवटी अजित पवार यांनी केलेले कामच दाखवावे लागते ना…,अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडाल स्मार्ट सिटी कसे बनवले हे विमानातून दाखवताना भाजपाचे आमदार…, आज सगळ्या कमेंटस् बोलत आहेत, अजितदादा…, आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या फेसबूकवर भाजपाने केलेले काम सांगावे…, अजितदादा विकासाचा महामेरू, तुमच्या फडणवीसांना दाखवा की अजितदादांनी केलेले काम आहे…, आमदारसाहेब, एकदा कार्यकर्त्यांची विमानातून ट्रीप होऊन जाऊ द्या…, हवेत रहा महेश लांडगे…, विकासाचे शिल्पकार अजितदादा…, सर्व क्रेडीट अजितदादांचे… अहो पाच वर्षआंत भाजपाने केलेले काम दाखवा…, शेवटी अजितदादांनी केलेली कामे दाखवली…तुमचे नविन काम काय ते सांगा…,स्मार्ट सिटीचे जनक अजित पवार…,रोखठोक अजितदादा अशा प्रकारच्या कमेंट्स यावेळी दिसून आल्या ..