वाहन परवाना आधारशी लिंक करणे बंधनकारक

0
364

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – बोगस वाहन  परवान्यांना आळा  घालण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.  वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आधारशी जोडणे (लिंक)  बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच कायदा केला जाणार आहे, अशी माहिती विधी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.