वाहनाच्या काचा फोडून तरुणाच्या खिशातील रोकड पळवली

0
290

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – लोखंडी कोयत्याने कारची काच फोडून नुकसान केले. त्यानंतर शिवीगाळ करून तरुणाच्या खिशातून एक हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हा प्रकार रामनगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. 21) घडला.

अक्षय अर्जून माने (वय 21, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अनोळखी 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामचंद्र साळंके (वय 26, रा. रामनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 21) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या राहत्या घराजवळ फिर्यादीच्या कारची काच फोडून आरोपींनी नुकसान केले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करून फिर्यादीच्या खिशातून एक हजार 200 रुपये काढून घेतले. त्यानंतर परिसरातील इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.