वायब्रो मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
230

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कंपनीत वायब्रो मशीनवर काम करत असताना मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्यात अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी पावणे दोन वाजता पिंपरी येथील स्पॅको कंपनीत घडला.

बिबिशन कीर्तन महाडूक (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. उडीसा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत बाळकृष्ण कीर्तन महाडूक (वय 30, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. उडीसा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हरिशचंद्र बापूराव कलमे (वय 46, रा. मोशी प्राधिकरण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा मयत बिबिशन हा पिंपरी येथील स्पॅको कंपनीत काम करत होता. कंपनीतील वायब्रो मशीनवर तो काम करत असताना मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्यात अडकून बिबिशन याचा मृत्यू झाला.

आरोपी कलमे याने मशीनची वेळोवेळी देखभाल करण्यास हयगय केल्याने हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.