वाकडमध्ये मजुर महिलेसोबत चालत्या लिफ्टमध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

0
1506

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – उच्चभ्रु सोसायटीच्या इमारतीतील लिफ्टमधून जात असताना एका इसमाने लिफ्टमध्ये घुसून चालत्या लिफ्टमध्ये मजुर महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.१२) पावनेआठ ते आठच्या दरम्यान वाकड येथील व्हिसलिंग पाल्म या सोसायटीत घडली.

याप्रकरणी पिडित ३५ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनराज काटेकर (रा. सांगवी) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित ३५ वर्षीय महिला हि मजुरीचे काम करते. शनिवारी पावनेआठ ते आठच्या दरम्यान त्या वाकड येथील व्हिसलिंग पाल्म या सोसायटीतील इमारतीच्या लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर जात होत्या. इतक्यात त्यांच्या लिफ्टमध्ये आरोप धनराज आला. लिफ्टचा दरवाजा बंद होताच त्याने पिडितेचा हात पकडून त्यांना मिठीत घेण्याचा प्रयत्न करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी धनराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराजला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.