वाकडमध्ये प्लॉट कमी किंमतीत विकत देण्यास नकार दिल्याने कुटुंबावर धारदार हत्यारांनी हल्ला

0
592

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – प्लॉट कमी किंमतीत विकत देण्यास नकार दिल्याने एका कुटुंबावर धारदार हत्यारांनी प्राणघात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.८) रात्रीच्या सुमारास वाकड पोलीस ठाणे हद्दीत घडली.

याप्रकरणी जखमी श्रीकांत सुर्वे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बबलू जोगदंडसह त्याची आई, बहीण आणि एक अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी श्रीकांत सुर्वे यांनी दहा महिन्यांपूर्वी एक गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला होता. हा प्लॉट आरोपी बबलू याला कमी किंमतीत हवा होता. मात्र, ते देण्यास श्रीकांत यांनी नकार दिल्याने आरोपी बबलूने सोमवारी रात्री मुलीला खासगी शिकवणीवरून घरी घेऊन येत असताना श्रीकांत यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच आरोपी बबलूने श्रीकांत यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला असता ते आपल्या घराच्या दिशेने पळाले, त्यापाठोपाठ बबलू त्याची आई, बहीण आणि एक अनोळखी व्यक्तीही त्यांच्या मागे धावले, बबलूकडे सत्तूर आणि अनोळखी व्यक्तीकडे कोयता होता त्या दोघांनी श्रीकांत यांच्यावर वार केले तर त्यांच्या पत्नीला आणि मुलीला ढकलून दिले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.